Breaking News

सातारा जिल्ह्यात 5 ते 18 ऑक्टोबर पर्यंत शस्त्र व जमावबंदी

Arms and mob ban in Satara district from 5th to 18th October

सातारा  : सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)  व 37 (1) (3) अन्वये दिनांक  5 ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री 0.00 पासून   ते दिनांक 18 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जारी केला आहे.

    सदरचा आदेश यात्रा, धार्मिक कार्य, लग्न विधी कार्य, अंत्यविधी कार्य  तसेच ज्या लोकांना शांततेच्या मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करावयाचा असेल त्याचवेळी पोलीस अधीक्षक, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकार, तसेच संबंधित  पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक यांची आगावू परवानगी घेतली असेल तर त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही, असे आदेशात नमूद आहे.

No comments