Breaking News

श्री दत्त इंडिया साखर कारखाना येथे लपलेल्या संशयितास अटक ; तपासात घरफोडीचा गुन्हा निष्पन्न

Suspect hiding at Shree Dutt India Sugar Factory arrested

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  : श्री दत्त इंडिया साखर कारखाना, साखरवाडी येथे अंधारात भिंतीच्या आडोशाला  लपून बसलेल्या एका संशयितावर फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान त्या संशयिताच्या चौकशीत व केलेल्या तपासात घरफोडीचा गुन्हा निष्पन्न झाला असल्याचे पोलीस निरीक्षक गोडसे यांनी कळविले आहे.  

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून समजलेल्या माहितीनुसार, दिनांक २ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास, पोलीस पेट्रोलिंग करत असताना, मौजे साखरवाडी ता. फलटण गावच्या हद्दीत  श्री दत्त इंडिया साखर कारखाना येथे, भिंतीच्या आडोशाला अंधारात तेजस जमीर खान वय ३५ वर्ष रा. निरा ता. पुरंदर  हा लपून बसलेला होता,  त्यास पोलिसांनी पकडून त्याची झडती घेतली, त्यास विचारणा केली असता त्याच्याकडून कोणतीही समाधानकारक उत्तर मिळाली नाहीत, सदर इसम दखलपात्र गुन्हा करण्याचे इराद्याने अंधारात आपले अस्तित्व लपवून संशयितरित्या मिळून आला व पोलिसांची गाडी पाहून लपून बसला असल्याचा गुन्हा तेजस खान यांच्या विरोधात नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार हंगे हे करीत आहेत.

    दरम्यान तेजस खान या संशयिताकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत श्री दत्त इंडिया साखर कारखाना साखरवाडी येथील   घरफोडीचा गुन्हा निष्पन्न झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोडसे यांनी दिली आहे.

No comments