Breaking News

श्री दत्त इंडिया साखर कारखाना येथे घरफोडी ; ८८ हजार रुपयांचे लोखंड लंपास

Burglary at Shree Dutt India Sugar Factory; Theft of 88 thousand rupees iron 

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  : श्री दत्त इंडिया साखर कारखान्याच्या स्विच यार्ड परिसरात  असलेले पत्र्याच्या शेडचे दरवाजाचे कुलूप तोडून,  ८८ हजार रुपये किंमतीच्या विविध आकाराच्या १३५० किलो वजनाच्या लोखंडी पट्ट्या  अज्ञात इसमाने चोरून नेल्या आहेत. दरम्यान सदर गुन्ह्यातील संशयित सापडला असून पुढील तपास चालू आहे.

     फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून समजलेल्या माहितीनुसार, दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोजी पहाटे ३ वाजण्यापूर्वी, मौजे साखरवाडी ता. फलटण गावच्या हद्दीत  श्री दत्त इंडिया साखर कारखान्याच्या, स्विच यार्ड परिसरात असलेल्या पत्र्याच्या शेडचे दरवाजाचे कुलूप तोडून,  ८८ हजार रुपये किंमतीच्या विविध आकाराच्या १३५० किलो वजनाच्या लोखंडी पट्ट्या अज्ञात इसमाने चोरून नेल्या आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे करीत आहेत.

    दरम्यान फलटण ग्रामीण पोलीस पेट्रोलिंग करीत असताना, श्री दत्त इंडिया साखर कारखाना, साखरवाडी येथे अंधारात भिंतीच्या आडोशाला  लपून बसलेल्या एका संशयितास फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक करून, संशयितरित्या लपून राहिल्या प्रकरणी  गुन्हा दाखल केला.  त्या संशयिताच्या चौकशीत व केलेल्या तपासात, उपरोक्त घरफोडीचा गुन्हा निष्पन्न झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोडसे यांनी दिली आहे.  

No comments