Breaking News

पोलीस हवालदार अच्युत जगताप यांची वाढदिवसादिवशी आत्महत्या

Police constable Achyut Jagtap committed suicide on his birthday

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  : फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अच्युत जगताप (वय ३१) यांनी दि.२ ऑक्टोबर रोजी त्यांच्या वाढदिवसादिवशी, पोलीस कॉलनी, फलटण येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  त्यांच्यावर एनकूळ ता. खटाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आत्महत्या मागचे कारण समजू शकलेले नाही.

   अच्युत जगताप हे दुपारी पोलीस ठाण्यातून घरी गेले  होते, बराच वेळ झाला ते माघारी न आल्याने ठाण्यातील पोलीस त्यांना फोन लावत होते, फोन उचलत नसल्याने व तपासासाठी बाहेर जायचे असल्याने दोन पोलिस त्यांना बोलविण्यासाठी पोलीस कॉलनीतील राहत्या घरी गेले असता, जगताप दार उघडत नसल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले त्यावेळी जगताप यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले. अच्युत जगताप यांचे मूळ गाव खटाव तालुक्यातील एनकुळ आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व १ वर्षाची मुलगी आहे. आत्महत्या केली त्यावेळी घरात कोणी कुटुंबीय नव्हते.

No comments