Breaking News

बाणगंगा नदीत १५ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

बाणगंगा नदीत शोध घेताना नागरिक

15-year-old boy drowned in Banganga river

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  : बाणगंगा नदीमध्ये पोहायला गेलेल्या एका १५ वर्षीय शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे, तर एकाला वाचविण्यात यश आले आहे. फलटण शहरालगत ठाकूरकी ता. फलटण गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

       अथर्व प्रदीप मांढरे (वय १५) असे मृत मुलाचे नाव असून तो इयत्ता १० वी मध्ये शिकत होता. रविवारी दि.२ ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या दरम्यान फलटण शहरातील बुधवार पेठ आणि शुक्रवार पेठ येथील पाच शालेय मुले शहरानजीक ठाकूरकी गावच्या हद्दीत पद्मावती मंदिराच्या लगतच्या ज्योतिबा मंदिरा समोरील बाणगंगा नदीत जास्त पाणी असलेल्या हत्ती डोहा जवळ पोहण्यासाठी गेले होते. त्यामध्ये दोघेजण पोहत असताना बुडू लागल्याने बाकीचे तीन जण आरडाओरड करीत लोकांना बोलवायला गेले. तेथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी दोघेजण बुडत असल्याचे पाहून पाण्यात उड्या टाकल्या त्यातील एकाला वाचविण्यात यश आले तर अथर्व पाण्यात बुडाला. दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला

No comments