Breaking News

आ. जयकुमार गोरे यांच्या पुतळ्याचे फलटण येथे दहन ; चुकीच्या वर्तनास जसेच्या तसेच उत्तर दिले जाईल

आ. जयकुमार गोरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करताना राजेगटाचे कार्यकर्ते

Statue of Jayakumar Gore burnt at Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ -  विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या म्हसवड येथील पुतळा दहनाचे तिव्र पडसाद फलटण येथे उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आज आमदार जयकुमार गोरे यांच्या पुतळ्याचे फलटण येथे दहन करत चुकीच्या वर्तनास जसेच्या तसेच उत्तर दिले जाईल असा संतप्त इशारा दिला आहे. 

      माण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्यास जाताना रामराजे नाईक निंबाळकर यांना निषेधाचे काळे झेंडे दाखविण्यात आले होते व म्हसवड येथे त्यांच्या पुतळ्याचे दहन करुन आमदार जयकुमार गोरे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. सदर कृतीचे आज फलटण शहरात संतप्त पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस तथा राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज आमदार जयकुमार गोरे यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करुन, शहरात गजानन चौक येथे त्याचे दहन केले. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात बोलण्याची लायकी नसणाऱ्यांच्या चुकीच्या कृतीला जशास तसेच उत्तर देण्यात येईल असा इशाराही कार्यकर्त्यांनी यावेळी दिला. 

        सदर आंदोलनात माजी नगरसेवक विक्रमभैया जाधव, राष्ट्रवादी पक्षाचे युवा आघाडीचे शुभम नलवडे, रामराजे युवा मंचचे अध्यक्ष राहुल निंबाळकर, गणेश शिरतोडे, पै.पप्पु शेख, प्रितसिंह खानविलकर, अभिजीत निंबाळकर, प्रवीण निंबाळकर, फिरोज बागवान, हरीष काकडे, माधव जमदाडे, जय रणदिवे, रोहित सपकाळ, रोहन पवार, प्रफुल्ल अहिवले, निरंजन पिसाळ, शिवराज फडतरे, नितीन मदने, अक्षय गायकवाड, अभिजीत निंबाळकर आदींसह असंख्य युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments