धुमाळवाडी येथे राज्याचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ - धुमाळवाडी, ता. फलटण, जि. सातारा येथे कृषि विभागा मार्फत एक दिवस बळिराजासाठी या उपक्रमा अंतर्गत डॉ.कैलास मोते, संचालक ( फलोत्पादन ) महाराष्ट्र राज्य यांनी दि १५ ऑक्टोबर २०२२ रोजी धुमाळवाडी ता. फलटण जि. सातारा येथील शेतकरी श्री. शरद पवार यांच्या सिताफळ , श्री. संजय धुमाळ यांच्या पेरू, श्री राहुल पवार यांच्या अंजीर , श्री.भुजंगराव निकम यांच्या द्राक्ष आणि श्री. राजाराम पवार व सुशील फडतरे यांच्या ड्रॅगन फ्रुट फळबाग क्षेत्रास भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. कैलास मोते यांनी सर्व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या विविध अडचणी तसेच फलोत्पादन अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व प्रक्रिया उद्योग बाबत चर्चा व सविस्तरपणे मार्गदर्शन केले. धुमाळवाडी गावात १०० % क्षेत्रावर फळपिके घेत आहेत, त्या बाबत सर्व शेतकऱ्यांचे कौतुक केले व आवश्यक ते सर्व सहकार्य करणेबाबत शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
यावेळी धुमाळवाडी गावातील शेतकऱ्यांना शेतकरी मासिकाचा योजना विशेषांक वाटप करण्यात आला.यावेळी डॉ. कैलास मोते फलोत्पादन संचालक महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते श्री सचिन जाधव कृषि सहाय्यक यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी विजयकुमार राऊत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सातारा, भास्करराव कोळेकर उपविभागीय कृषि अधिकारी फलटण, सागर डांगे तालुका कृषि अधिकारी फलटण, श्री.अमोल सपकाळ मंडळ कृषि अधिकारी विडणी, श्री. अशोक जगदाळे कृषि पर्यवेक्षक विडणी १, श्री. योगेश भोंगळे कृषि पर्यवेक्षक विडणी २, कृषि सहायक श्री.सचिन जाधव, सरपंच सौ. पल्लवी पवार मॅडम व ग्रामपंचायत सदस्य समीर पवार ,प्रगतशील शेतकरी रवींद्र धुमाळ , राजराम पवार,नीलकंठ धुमाळ,रामदास पवार, पंकज फडतरे,आनंद धुमाळ,चेतन धुमाळ ,श्रीकांत फडतरे, हरीश हुंबे पंचक्रोशीतील गावातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
No comments