चारचाकी गाडीची काच फोडून साडेअकरा लाख रुपये लंपास
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ : फलटण शहराच्या लक्ष्मीनगर भागात रस्त्याच्या कडेला लावलेल्या कंत्राटदाराच्या चारचाकी गाडीची मागील काच फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल साडेअकरा लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, धुळदेव, ता. फलटण येथील एमएसईबीचे कंत्राटदार प्रवीण गोविंद कोल्हे (वय ३२) यांनी शुक्रवार दि.७ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास, एचडीएफसी बँकेतून ११ लाख ९६ हजार रक्कम काढली. नंतर ते मित्रांसोबत होम डेकर ऑफिस, लक्ष्मीनगर येथे गेले. तेथे त्यांची टाटा कंपनीची हेरिअर ही चारचाकी उभी केली. व ११ लाख ५० हजार रुपये असलेली पैशाची पिशवी हेरीअर क्र. एम एच ११ सी एल ०७७७ गाडीच्या मागच्या सीटवर ठेवुन गाडी लॉक केली. त्यानंतर प्रवीण कोल्हे हे ११.३० वाजता मित्राच्या ऑफिसमध्ये गेले. व फ्रेश होवुन ११.४० वाजण्याच्या सुमारास गाडीजवळ आले. दरम्यानच्या काळात हेरिअर गाडीच्या ड्रायव्हर सीटच्या मागील काच फोडून अज्ञात चोरट्याने सीटवर पिशवीत ठेवलेले ११ लाख ५० हजार रुपये लंपास केले.
No comments