मेथीघास पासून बायोगॅस प्रकल्प करण्याचा प्रयत्न - श्रीमंत रामराजे ; खटकेवस्ती यथे विविध विकास कामांचे श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते उद्घाटन
गोखळी ( गंधवार्ता वृत्तसेवा) - आपल्या कडे शेतकरी ऊसाबरोब एक, दोन पांड मेथी घास, हत्ती घास जनावरांसाठी करतात, या घासापासून बायोगॅस प्रकल्प सुरू करण्याचे माझ्या डोक्यात आहे. जसे के. बी. एक्सपोर्ट कंपनीकडून भेंडी शेतकऱ्यांकडून घेऊन एक्सपोर्ट केली जाते, त्या प्रमाणे एकमेकांची सांगड घालून, मेथी व हत्ती घासापासून बायोगॅस प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचा श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील खटकेवस्ती येथील विविध विकास कामांचे विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आ.दिपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराचे खर्डेकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद माजी सदस्या सौ. उषादेवी गावडे उपस्थित होते.
पुढे बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, जलजीवन मिशन योजनेबाबत तालुक्यातील विरोधकांकडून गैरसमज पसरवला जात आहे, 'जलजीवन मिशन' ही योजना आत्ताचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे मागच्या आघाडी सरकारमध्येही पाणीपुरवठा मंत्री होते, त्यावेळी आपल्या तालुक्यातील ४०-५० लहान, मोठ्या गावात 'जल जिवन मिशन' योजनेची कामे सुरू झाली, ही योजना जरी केंद्रांची असली तरी त्याचा प्रस्ताव तयार करणे, गाव पातळीवर जाऊन सरपंच आणि इतरांना घेऊन जागा निश्चित करणे, पाण्याचे सोर्स निश्चित करणे हे सर्व काम महाराष्ट्र राज्याने महाविकास आघाडी सरकारने केले असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
![]() |
घरकुलाची किल्ली श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते लाभार्थीना देत असताना डावीकडून बजरंग खटके,शिवरुपराजे खर्डेकर,आ.दीपक चव्हाण, सरपंच बापूराव गावडे, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर |
शिवरुपराजे यांनी जिल्हा बँकेकडून सोसायटी यांना देण्यात येणारा डिव्हिडंड अकाऊंटवर जमा न करता रोखीने द्यावा अशी मागणी केली असता, श्रीमंत रामराजे म्हणाले ७ तारखेला आम्ही निर्णय करू बँक जेव्हा निर्णय घेते तेव्हा जिल्ह्याला डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले जातात तो सर्वांनी मान्य करावा.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जय तुळजाभवानी मंदिरात जावून श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. नव्याने बांधण्यात आलेल्या १०४ घरकुलांपैकी बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांचे श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते चावी देऊन लाभार्थींना वितरण करण्यात आले. नवीन मंजूर विकास कामांचे भूमिपूजन करण्यात.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराचे खर्डेकर म्हणाले यावर्षी याभागात कापसाची १७०० एकराच्या आसपास लागवड झालेली आहे. श्रीमंत रामराजे यांनी लक्ष घालून आसू येथील काळेश्वर कॉटन जिनिंग सुरू करावी. अडचणीत असणारा श्रीराम सहकारी साखर कारखाना अडचणीतून बाहेर काढला तसे आसू येथील बंद काळेश्वर कॉटन जिनिंग सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली.
सरपंच बापूराव गावडे यांनी प्रास्ताविक केले यावेळी बोलताना ते म्हणाले, खटकेवस्ती येथे झालेली सर्व विकास कामे श्रीमंत रामराजे यांच्यामुळेच मी करू शकलो, फक्त दिड महिन्याच्या कालावधीत संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद काळात तालुक्यातील ४५० लाभार्थीपैकी खटकेवस्ती येथील १०० लाभार्थींना मी न्याय देऊ शकलो. अजून काम करण्याची संधी मिळाली असती तर अजून जादा लाभार्थीना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला असता, असे सांगून ते पुढे म्हणाले, खटकेवस्ती येथील मागासवर्गीय वस्ती साठी ३२००० लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी , जल जिवन मिशन अंतर्गत पाईप लाईन, सिमेंट रस्त्याचे काम,भुमिगत गटार,गोसावी वस्ती, नंदीवाले वस्ती वॉल कंपाऊंड, वळकुंडे वस्ती सभामंडप आदी करण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी खटकेवस्तीचे सरपंच बापूराव गावडे यांचे तुळजाभवानी नवरात्र उत्सवास दरवर्षी सहकार्य असते म्हणून तुळजाभवानी मंदिर समितीचे वतीने सरपंच बापूराव गावडे यांचा वाढदिवस श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा पाणीपुरवठा समिती सदस्य विश्वास दादा गावडे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन बजरंग खटके, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष खटके, तानाजी गावडे पाटील,गोखळी विकास सोसायटीचे चेअरमन तानाजी बापू गावडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सागर गावडे पाटील, मुकूंद रणवरे,माजी नगराध्यक्ष ॲड. बाबुराव गावडे, अक्षयकुमार गावडे, राधेश्याम जाधव, खटकेवस्ती चे राजेंद्र धुमाळ,गोखळीचे पोलिस पाटील विकास शिंदे, मिलिंद खटके, माजी सरपंच संतोष खटके, प्रमोद झांबरे, जय तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष पै. रामचंद्र गावडे यांनी मानले.
No comments