फलटण येथे बौद्ध समाजाचा महामेळावा ; कडूबाई खरात व उमेश गवळी यांचे गीत गायन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ - ६६ व्या धम्मचक्र परिवर्तन दिना निमित्त सोमवार दि. १० ऑक्टोबर २०२२ रोजी सांयकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, फलटण येथे बौद्ध समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्याप्रसंगी गायिका कडूबाई खरात व ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट फेम उमेश गवळी यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. महामेळावा व गीत गायन कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर हे महामेळाव्यास शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. महामेळावा व गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन सनी(दादा) अहिवळे, हरीष काकडे (आप्पा), संग्राम अहिवळे व सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.
धम्मचक्र परिवर्तन दिना निमित्त घेण्यात घेण्यात आलेल्या महामेळाव्यात मान्यवर आपले विचार व्यक्त करणार आहेत, तसेच याप्रसंगी महाराष्ट्राच्या भिम- बुद्ध गीत गायिका, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे... फेम कडूबाई खरात व ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट... फेम उमेश गवळी यांच्या गीत गायनाचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाप्रसंगी आंबेडकरी चळवळीत योगदान दिलेल्या कार्यकर्त्यांचा व उच्च शिक्षण घेतलेल्या बांधवांचा सन्मान होणार आहे. याप्रसंगी पत्रकारांचा देखील सन्मान होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
No comments