Breaking News

गिरवी येथे चंदनाच्या झाडाची चोरी

Theft of sandalwood tree at Girvi

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)   : शेताच्या बांधावर असणारे ७० हजार रुपयांचे चंदनाचे झाड चोरुन नेल्या प्रकरणी गिरवी ता. फलटण येथील दोघांवर फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आहे.

     सुदाम रघुनाथ मदने वय ३० व कृष्णा जयसिंग मदने वय ३ दोघेही रा. लिंबाचा ओढा, गिरवी ता. फलटण अशी गुन्हा नोंद झालेल्या संशयीतांची नावे आहेत. याबाबत चंद्रकांत मुगुटराव कदम वय ६४ यांनी फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २१ सप्टेंबर रोजीच्या सायंकाळी ७ नंतर व २२ सप्टेंबर रोजीच्या सकाळी ७ वाजण्यापुर्वी, गिरवी ता. फलटण हद्दीतील बोडकेवाडीकडे जाणारऱ्या रस्त्यालगत असलेल्या गट नंबर २७४ मधील कदम यांच्या शेतातील बांधावरील तीन फूट घेराचा बुंधा असलेले ७० हजार रुपये किंमतीचे चंदनाचे झाड कट करुन सुदाम रघुनाथ मदने व कृष्णा जयसिंग मदने यांनी मिळून चोरुन नेले आहे. याबाबत अधिक तपास पोलिस हवालदार खाडे करीत आहेत.

No comments