Breaking News

पिंप्रद येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Minor girl molested in Pimprad ; A case has been registered under POCSO

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २९ : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तीच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत, तीचे चुलते व चुलत भाऊ यांना दारुच्या नशेत शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना पिंप्रद ता. फलटण येथे घडली आहे. या प्रकरणी धीरज रामदास कापसे वय २४ रा. पिंप्रद ता. फलटण याच्यावर बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा नोंद झाला आहे. 

    याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातुन मिळालेली माहिती अशी की, २१ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास पिंप्रद येथे धीरज कापसे याने संबंधीत अल्पवयीन मुलीच्या आईच्या मोबाईल नंबरवर फोन केला. फोनवर मुलीला, तू घराचे पाठीमागे शेतात भेटायला ये, तू भेटायला आली नाहीस तर मी तुझ्या घरच्या लोकांना मारून टाकीन अशी धमकी दिली. यानंतर त्या मुलीस लग्नाची मागणी करुन तीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर तुझ्या घरच्यांना मारून टाकीन अशी धमकी दिली. यानंतर सदर मुलीचे चुलते व चुलत भाऊ यांना त्याने दारू पिऊन मारहाण करून शिवीगाळी व दमदाटी केली. याप्रकरणी पिडीत मुलीने ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत.

No comments