Breaking News

'आधुनिक भगीरथ' या चरित्र ग्रंथाचे २ ऑक्टोबर रोजी प्रकाशन

Publication of biographical book 'Adhunik Bhagirath' on 2nd October

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : श्रीमंत मालोजीराजे स्मृति प्रतिष्ठान, फलटण आयोजित व प्राचार्य विश्वासराव देशमुख लिखित 'आधुनिक भगीरथ' या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित असणाऱ्या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन समारंभ रविवार, दिनांक ०२ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता  महाराजा मंगल कार्यालय, फलटण, जि. सातारा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत  संपन्न होत आहे.

    आधुनिक भगीरथ या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त सचिव शिवाजीराव उपासे यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर प्रकाशन समारंभाचे अध्यक्षपद श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे भूषवणार आहेत,  यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी धोम - बलकवडी प्रकल्प विभाग, वाई सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुरेन जगन्नाथ हिरे, धोम - बलकवडी प्रकल्प, उपविभाग क्रमांक १ फलटण, सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी धनंजय सदाशिव घोगरे यांचा विशेष सत्कार होणार असल्याचे श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व उपाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कळवले आहे.

No comments