खटकेवस्ती येथे २ टन डाळिंबाची चोरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : खटकेवस्ती ता. फलटण येथील दिड एकर क्षेत्रातील तिनशे डाळींबाच्या झाडांची सुमारे २ टन वजनाची व ६० हजार रुपये किंमतीची मोठी डाळींबे आज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहेत.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, खटके वस्ती गावच्या हद्दीतील आसू फलटण रस्त्यावर असलेल्या अमोल बापूराव खटके रा. खटकेवस्ती यांच्या शेतातील दिड एकर क्षेत्रातील तिनशे डाळींबाच्या झाडांची सुमारे दोन टन वजनाची व साठ हजार रुपये किंमतीची मोठी डाळींबे आज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहेत. दिनांक २० सप्टेंबर रोजीच्या रात्री ९ ते २१ सप्टेंबर रोजीच्या सकाळी ९.३० वाजण्याच्या पुर्वी ही चोरीची घटना घडली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सूर्यवंशी हे करीत आहेत.
No comments