Breaking News

कुरवली येथील ट्रान्सफॉर्मर फोडून १५० किलो तांब्याची तार लंपास

150 kg of copper wire was stolen after breaking the transformer at Kurvali

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : कुरवली खु. ता. फलटण येथील विद्युत ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याची तार व ऑइल असा सुमारे ४५ हजार रुपयांचा ऐवज आज्ञात चोरट्याने लंपास केला आहे.

      याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातुन मिळालेली माहिती अशी की, कुरवली खु. ता. फलटण येथील गोळे डीपी म्हणून परिचित असणारा ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यामधील ४० हजार रुपये किंमतीची १५० किलो तांब्याची तार काढून आज्ञाताने चोरुन नेली व त्यातील ५ हजार रुपये किंमतीचे शंभर लिटर ऑइल सांडून नुकसान केले. दि. २९ सप्टेंबर रोजी रात्रीचे बारा व सकाळी सातच्या दरम्यान ही घटना घडली आहे. याबाबत वायरमन सुनील जाधव यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असुन पुढिल तपास सहय्यक फौजदार भीकू राऊत करीत आहेत.

No comments