Breaking News

लंम्पी चर्म रोग ; शेळी, मेढ्यांच्या बाजार भरविण्यास कोणतेही निर्बंध नाहीत

Lumpy skin disease; There are no restrictions on selling goats and sheep

    सातारा : लंम्पी चर्म रोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शेळी, मेढ्यांच्या बाजार भरविण्यास व बाजरामध्ये विक्री तसेच वाहतूक करण्याबाबत कोणतेही निर्बंध लागू केलेले नाहीत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त       डॉ. अंकुश परिहार यांनी दिली आहे.

    जिल्ह्यातील जनावरांचे बाजारामध्ये शेळ्या, मेंढ्यांची विक्री तसेच वाहतूक याबाबत कोणतेही निर्बंध लागू केले नाहीत. जिल्हाधिकारी यांच्या दि. 7 सप्टेंबर 2022 च्या आदेशान्वये फक्त गोवर्गीय व म्हैस वर्गीय जनावरांची वाहतूक, बाजार जत्रा, प्रदर्शन व शर्यत आयोजित करण्यातस मनाई करण्यात आली आहे, असेही डॉ. परिहान यांनी कळविले आहे.

No comments