Breaking News

मिरगाव ता. फलटण येथे महिलेवर बलात्कार

Mirgaon Woman raped in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ - मिरगाव ता. फलटण येथे, पीडित महिलेच्या घरात शिरून, पीडित महिला एकटी असल्याचा गैरफायदा घेत, घराची कडी लावून, महिलेच्या विरोधात जबरदस्ती करून शारीरिक संबंध केल्या प्रकरणी, मिरगाव ता. फलटण येथील अरविंद नानासो सरक याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    याबाबत पीडित महिलेने, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,  दिनांक ७ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास  मौजे मिरगाव ता. फलटण येथे आरोपी नामे अरविंद नानासो सरक रा. मिरगाव ता. फलटण यांनी अचानक मी माझे घरात एकटीच असताना,  घरात येऊन घराची कडी आतून लावून, मी ओरडले असता, माझे तोंड दाबुन, मला घरातील बेडवर झोपवून, माझे ईच्छेविरूध्द माझेवर जबरदस्ती करून माझेशी शारिरीक संबंध केले व तु तुझ्या घरातील कोणालाही माझ्याबद्दल काय सांगितले तर, मी तुला जिवंत ठेवणार नाही. अशी धमकी देऊन घरातून निघून गेला असल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे, त्यानुसार फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला अरविंद सरक याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. अरगडे हे करीत आहेत.

No comments