Breaking News

शिष्यवृत्ती अर्ज करण्यास 30 जून पर्यंत मुदतवाढ

Scholarship application deadline is June 30

    सातारा -  शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी या योजनेचे विजाभज , इमाव व विमाप्र प्रवर्गातील अर्ज महाडीबीटी पोर्टलवर नुतनीकरण  (Renewal) अर्ज व नवीन अर्ज नोंदणी दि. 14 डिसेंबर  2021 पासून सुरूवात करण्यात आलेली आहे. जिल्हयातील काही महाविदयालयात उशीरा प्रवेश होणे, उशीरा निकाल लागणे इ. कारणांमुळे बऱ्याच विदयार्थ्यांना शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर करता आले नाहीत. विदयार्थी  शिष्यवृत्ती पासून वंचित राहू नये म्हणून अद्याप शिष्यवृत्तीचे अर्ज न भरलेल्या विदयार्थ्यांसाठी शासनाने ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ   दिलेली आहे.  

      तरी सातारा जिल्हयातील पात्र विदयार्थ्यांनी सन २०२१-२२ शिष्यवृत्तीचे अर्ज विहित मुदतीत ऑनलाईन महाविद्यालयांकडे सादर करावेत. तसेच सदरचे  अर्ज संबधीत महाविदयालंयानी समाज कल्याण विभागाकडे पडताळणी करून सादर करावेत.  महाविदयालयांनी अर्ज भरण्याची सुविधा महाविद्यालयातच उपलब्ध करून दयावी. तसेच जिल्हयातील सर्व महाविदयालयांनी अर्ज भरण्याबाबत जनजागृती करावी. महाविदयालय स्तरावरील सर्व पात्र अर्ज या कार्यालयाकडे वर्ग करावेत. असे आवाहन  नितिन उबाळे , सहायक आयुक्त समाज कल्याण, सातारा यांनी केले आहे. 

No comments