छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त फलटण येथे दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
फलटण : तिथीनुसार वैशाख शु|| २, सोमवार दि. २ मे रोजी फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त आज सोमवारी सकाळी आयोजित दुचाकी रॅलीला शहर व परिसरातील युवक/युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
फलटण शहर व तालुक्यात परंपरेप्रमाणे छ. शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा केला जात असून पूर्वसंध्येला रात्री १२ वाजता छ. शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी मंगळवार दि. २ मे रोजी सकाळी १० वाजता फलटण शहरातील प्रमुख मार्गावरुन दुचाकी रॅली आयोजित करण्यात आली होती. दुचाकी रॅलीला श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब पुतळा परिसर येथून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
सदर दुचाकी रॅली फलटण शहरातील श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब पुतळा, म. फुले पुतळा, गजानन चौक, शंकर मार्केट, शुक्रवार पेठ, उंब्रेश्वर चौक मलठण, पाचबत्ती चौक, बारामती चौक छ. शिवाजी महाराज चौक या मार्गाने संपन्न झाली. या रॅली मध्ये युवक/युवती शिवकालीन पोशाखात सहभागी झाले होते. दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुचाकी रॅली शांततेत संपन्न झाली.
No comments