माझा मनसे निवेदनाशी संबध नाही ; संबंधितावर कारवाई करावी - अय्याज ऊर्फ शाहिर कोतवाल
MNS has no connection with this party - Ayyaz alias Shahir Kotwal
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ मे - महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या तर्फे, मशिदीवरील भोंगे उतरवण्या बाबत देण्यात आलेल्या निवेदनाशी माझा कोणताही संबंध नसल्याचे जाहीर करतानाच, माझ्याविषयी गैरसमज पसरवणाऱ्या मनसे पदाधिऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अय्याज ऊर्फ शाहिर कोतवाल यांनी पोलीस स्टेशनला फलटण पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
अय्याज ऊर्फ शाहिर कोतवाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना फलटण यांचे तर्फे श्री. युवराज आमृत शिंदे राहणार ठाकुरकी, यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण व शहर पोलीस ठाणे यांना, फलटण शहर व तालुक्यातील मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत जे निवेदन देण्यात आले आहे. त्या निवेदनात अय्याज कोतवाल नावाचा उल्लेख आहे. मात्र मनसे या पक्षाशी किंवा निवेदनाशी माझा काहीही संबंध नाही, माझे नाव मुद्दाम लबडीने व हेतुपुरस्पर घेऊन, हिंदु-मुस्लिम समाजामध्ये, जातीय तेढ निर्माण करण्याचा कुटील डाव व प्रयत्न सुरु आहे. याची चौकशी करून संबधीत व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा.
No comments