Breaking News

खोटी सही करून २७ हजर ८०० रुपयांचा अपहार व फसवणूक

Embezzlement and fraud of Rs. 27,800 by forging signature

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)   - महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी सातारा जिल्हा सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. सातारा शाखा फलटण या संस्थेत तिऱ्हाईत इसमाच्या नावे व्हौचर बनवुन त्यावर त्यांची खोटी सही करून, २७ हजार ८०० रुपये रक्कमेचा स्वतःच्या नावे चेक अदा करून, चेक  वटवुन,  रक्कमेचा अपहार करून फसवणुक केल्याप्रकरणी सातारा येथील संजय शिवलिंग आप्पा तोडकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

    फलटण शहर पोलीस स्टेशन पण मिळालेल्या माहितीनुसार,  दि.७ मे रोजी संजय शिवलिंग आप्पा तोडकर रा. गौरी शंकर सोसायटी अर्क शाळेचे मागे शाहुपुरी, सातारा यांनी, पृथ्वी चौक फलटण येथे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी सातारा जिल्हा सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. सातारा शाखा फलटण या संस्थेत, रक्कम रुपये २७,८९०/- रुपयांचे कार्तिकस्वामी तुळशिराम गुरव यांच्या नावे व्हौचर बनवुन, त्यावर त्यांची खोटी सही करून, सदर रक्कमेचा स्वतःच्या नावे चेक अदा करून, तो चेक अप्रामाणिकपणे वटवुन २७ हजार ८०० रुपये रक्कमेचा अपहार करून फसवणुक असल्याची फिर्याद मयुर प्रकाश माने यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार येळे हे करीत आहे.

No comments