उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप ; हॉकी ओलंपियन राहुल सिंग व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थिती
![]() |
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी मान्यवरांसमवेत खेळाडू |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती मार्फत १५ एप्रिल २०२२ ते ३० एप्रिल २०२२ या दरम्यान उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचा समारोप समारंभ श्रीमंत शिवाजीराजे क्रीडांगण (घडसोली मैदान) फलटण येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे १९९६ अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेले श्री राहुल सिंग यांच्या उपस्थितीमध्ये व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली थाटात संपन्न झाला.
![]() |
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामध्ये बोलताना महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर |
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी खेळाडूंना या प्रशिक्षण शिबिरातून विद्यार्थ्यांना मैदानाची व खेळाची आवड नक्कीच निर्माण झाली असेल असे सांगून या खेळाडूंनी इथून पुढच्या काळात अशाच पद्धतीने दररोज सराव करून, आपल्या खेळांमध्ये प्रावीण्य मिळवावे असे आवाहन केले, तसेच फलटण मध्ये इथून पुढच्या काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान (astroturf) लवकरात लवकर तयार करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत असे सांगितले. क्रीडा समितीचे चेअरमन श्री शिवाजीराव घोरपडे यांचा आवर्जून उल्लेख करत श्रीमंत संजीवराजे यांनी, ते फुटबॉल, हॉकी या दोन खेळांमध्ये तरबेज होते असे सांगितले व त्यांच्या बरोबर आम्हीदेखील फुटबॉल हा खेळ खेळत होतो, असे सांगून आत्ता वयाच्या ऐंशीव्या वर्षी देखील तेवढ्याच जोमाने ते क्रीडाक्षेत्र पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.
![]() |
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामध्ये बोलताना हॉकी ओलंपियन राहुल सिंग |
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री राहुल सिंग यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना, फलटण सारख्या ठिकाणी एवढे खेळाडू विविध खेळांमध्ये सहभाग घेतात, हे पाहून मला खूप आनंद झाला आहे असे म्हटले, तसेच खेळांमध्ये सातत्य असणे फार गरजेचे आहे, त्याचप्रमाणे फलटण शहरामध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू सहभागी होतात, परंतु जर फलटणमध्ये भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान असणे गरजेचे सांगितले. यावेळी फलटणच्या हॉकी खेळाडूंना पद्मश्री श्री धनराज पिल्ले सर यांच्या समवेत खेळाडूंना मार्गदर्शन करणार असल्याचे राहुल सिंग यांनी सांगितले.
या समारोप समारंभासाठी तालुका क्रीडा अधिकारी श्री महेश खुटाळे सर, प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम सर, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री गंगवणे बी. एम., उपप्राचार्य श्री ननवरे ए.वाय., ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री फडतरे सर, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या दिक्षित मॅडम, फाळके मॅडम, नसरीन मॅडम, क्रीडा समितीचे सदस्य श्री महादेव माने , सीनियर हॉकी खेळाडू श्री महेंद्र जाधव, श्री सुजित निंबाळकर, श्री प्रवीण खाडे, श्री सुमित मोहिते, श्री सचिन लाळगे, व क्रीडा समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा समितीचे सदस्य श्री तुषार मोहिते सर यांनी केले. प्रास्ताविक क्रीडा समितीचे चेअरमन श्री शिवाजीराव घोरपडे साहेब यांनी केले.
प्रास्ताविकामध्ये घोरपडे यांनी या शिबिराची सर्व माहिती सांगितली व विविध खेळांमध्ये कोणकोणत्या क्रीडा मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले याची माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हॉकी ओलंपियन खेळाडू श्री राहुल सिंग यांचा परिचय क्रीडा समितीचे सचिव श्री सचिन धुमाळ सर यांनी करून दिला. त्यानंतर शिबिरार्थी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
१५ दिवसाच्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामध्ये तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये खो-खो चे राष्ट्रीय प्रशिक्षक श्री प्रशांत पवार सर, ऍथलेटिक्स या खेळासाठी राष्ट्रीय प्रशिक्षक श्री राजगुरू कोथळे सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच या शिबिरा ला आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू कुमारी अक्षदा ढेकळे व वैष्णवी फाळके यांनी देखील भेट देऊन सर्व खेळाडूंना मार्गदर्शन दिले.
या कार्यक्रमाचे आभार क्रीडा समितीचे सदस्य प्रा. श्री तायाप्पा शेडगे सर यांनी केले. आभारा मध्ये माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे हे शिबिर यशस्वी पार पाडता आले म्हणून त्यांचे विशेष आभार मानले तसेच हॉकी ऑलिंपियन राहुल सिंग यांनी वेळात वेळ काढून या समारोप समारंभासाठी उपस्थित राहून खेळाडूंना मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे देखील आभार मानले. त्याचप्रमाणे मुधोजी हायस्कूल चे प्राचार्य श्री गंगवणे बी .एम. यांनी शिबिरासाठी लागणारे मैदान व्यवस्थित तयार करून दिल्याबद्दल व वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे देखील आभार मानले. आभार प्रदर्शनानंतर सर्व उपस्थित मान्यवरांसोबत शिबिरार्थी खेळाडूंचा खेळानुसार फोटो सेशन घेण्यात आला व उपस्थित सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हे शिबिर पंधरा दिवस यशस्वी रित्या पार पडण्यासाठी श्री संजय फडतरे, प्रा.श्री स्वप्नील पाटील सर ,श्री राज जाधव, श्री खुरंगे बी.बी. सर, श्री शिंदे वि. जी. सर , श्री बोराटे सर, सुळ सर, श्री जाधव डि. एन, श्री पवार सर, श्री वाघमोडे सर, श्री घोरपडे सर, कु. धनश्री क्षीरसागर मॅडम,श्री अमित काळे सर, अविनाश गंगतीरे, गव्हाणे मॅडम यांनी विशेष सहकार्य केले.
No comments