जिल्हास्तर मल्लखांब, रोप मल्लखांब प्रशिक्षण केंद्राचे बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
सातारा (जिमाका) : श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात तयार करण्यात आलेल्या जिल्हास्तर मल्लखांब, रोप मल्लखांब प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक उपस्थित होते.
यावेळी सिंथेटिक लॉन-टेनिकस मैदान व जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत क्रीडांगण विकास अनुदान योजनेतून खरेदी करण्यात आलेल्या मिनी रोलरचेही लोकार्पण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
No comments