सत्य परेशान हो सकता है पराजीत नही - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -दिगंबर आगवणे यांनी खासदार रणजितसिंह यांच्यावर आर्थिक फसवणूकीचा आरोप करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती परंतु आता दिगंबर आगवणे यांच्यावरच आर्थिक फसवणुकीचे गुन्हे पडत आहेत, यावर बोलताना खा.रणजितसिंह म्हणाले, दिगंबर आगवणे अचानकपणे मिडीया समोर गेले. माझ्या विरुध्द पुरावे असल्याचे सांगुन मला बदनाम करण्याचा त्यांचा कट न्यायालयाने व पोलिसांनी उधळला आहे. मला याबाबत एवढेच म्हणायचे आहे की, सत्य परेशान हो सकता है पराजीत नही. या कटात फलटणच्या काही लोकप्रतिनिधींचा समावेश आहे, योग्य वेळ आल्यावर आपण त्यावर बोलू असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
सुरवडी ता. फलटण येथील हॉटेल निसर्ग येथे पत्रकारांशी संवाद साधताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते.
विरोधकाला पोलिसांमार्फत संपवायचे किंवा बदनामी करायची ही विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची जुनी सवय आहे. परंतू माझ्या बाबतीमध्ये त्यांचा हाथ आहे किंवा नाही यावर पुराव्याशिवाय बोलणे योग्य ठरणार नाही असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. माझ्या प्रकरणात प्रशासनावर दबाव आला, ताण आला परंतू त्यांनी आपला दुरुपयोग होऊ दिला नाही असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
No comments