Breaking News

सिल्वर ओक वरील हल्ल्याचा जाहीर निषेध; भाजपचे षडयंत्र निघाले तर राजीनामा देऊ - खासदार रणजितसिंह

Public protest against the attack on Silver Oak; If there is a BJP conspiracy, I will resign - MP Ranjitsingh

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  खासदार शरदराव पवार यांच्या सिल्वर ओक या मुंबई येथील निवासस्थानावरील हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. कारण खासदार सुप्रियाताई सुळे जर पुढे येऊन सावरलं नसतं तर तेथे शंभर टक्के दुर्घटना घडली असती, अशा पद्धतीने  भ्याड पद्धतीचा हल्ला एखाद्या नेत्यावर किंवा कुटुंबावर होणे हे चुकीचे आहे. या हल्याचा मी जाहीर निषेध करतो. याप्रकरणात भाजपचा हाथ असल्याचा चुकीचा आरोप होत आहे. भाजपची संस्कृती व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपणास पुरेपुर विश्वास व खात्री आहे. त्यामुळे यामागे भाजपचे षडयंत्र सिध्द झालं तर आपण निश्चितपणे राजिनामा देवू असे प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

       सुरवडी ता. फलटण येथील हॉटेल निसर्ग येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

    शरद पवार हे महाराष्ट्रातील मोठे राजकीय नेतृत्व आहे. आम्ही राजकीय विरोधक असलो तरी महाराष्ट्राचे नेते म्हणून आम्हाला शरद पवार यांचा शंभर टक्के आदर आहे असे स्पष्ट करुन खासदार निंबाळकर म्हणाले, लोकशाही पध्दतीत निषेध व्यक्त करण्यासाठी विविध मार्ग आहेत. कुणाच्या कुटूंबावर असा भ्याड हल्ला होत असेल तर भाजपचा माढा लोकसभा मतदार संघाचा खासदार म्हणून मी त्याचा निषेध व्यक्त करतो. खासदार सुप्रियाताईंनी जर परिस्थिती व्यवस्थित हाताळली नसती तर निश्चितपणे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी उकसवल्याने जमावाने हा प्रकार केला का? यावर बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, यामागे निश्चितपणे काहीतरी षडयंत्र आहे. परंतू चौकशीतून नेमकं कोण ? हे निष्पन्न होत नाही, तोवर बोलणे योग्य ठरणार नाही. 

No comments