फलटण तालुक्यातील मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे हटविण्याची मनसेची मागणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण शहरासह तालुक्यातील विविध मशिदीवर बेकायदेशीर पध्दतीने भोंगे बसविण्यात आले आहेत ते त्वरित हटविण्यात यावेत अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष युवराज शिंदे व इतर कार्यकर्त्यांनी केली आहे .
या भोंग्या वरून मोठ मोठ्या आवाजात अजाण दिल्याने लहान मुले , विद्यार्थी ,वयोवृद्ध नागरिक ,विविध प्रकारच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना नाहक त्रास होत आहे तसेच या भोंग्या बाबतीत मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे व प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या नियमांचे सुद्धा फलटण शहर व तालुक्यात सर्रासपणे उल्लंघन होताना दिसून येत असून हा प्रकार खूपच गंभीर आहे, यातून मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत असल्याने, याबाबतीत ही संबंधितावर योग्य ती कारवाई होणे अपेक्षित व आवश्यक आहे.अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
विविध जाती धर्माच्या सण-उत्सव व रीतिरिवाज साजरा करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध नव्हता व नाही याबाबतीत महान संत कबीर यांनी सुद्धा मुल्ला हो कर बांग पुकारे वह क्या साहब बहरा है ?? अशा प्रकारचा सवाल केला आहे .
म्हणून मनसेचा विरोध अजानला नसून अजान बाबतीत जाणीवपूर्वक बाळगलेला अजाणतेपणाने करण्यात येणाऱ्या कृतीला आहे, मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे त्वरित हटविण्यात यावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी अय्याज कोतवाल अजित भोईटे , निलेश जगताप , राहुल खुडे , ज्ञानेश्वर चौधरी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments