Breaking News

कोयना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहार जागेची पाहणी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली

Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai inspected the proposed boating site at Koyna Reservoir

  सातारा : कोयना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहार जागेची पाहणी  गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज दसाई यांनी आज केली.

   या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, प्रांतधिकारी सुनिल गाडे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे आदी उपस्थित होते.

    पाहणी प्रसंगी श्री. देसाई म्हणाले, कोयना जलाशयात पर्यटकांसाठी नौकाविहार सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय  यांच्यासोबत  बैठका झालेल्या आहेत. कोयना जलाशयात पर्यटकांसाठी नौकाविहार सुरु झाल्यास स्थानिकांनाही रोजगार मिळणार आहे. कोयना जलाशयात नौकाविहार सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असून पर्यटक व धरणाची सुरक्षितता पाहुनच योग्य तो प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत लवकरच पाठविण्यात येईल.

No comments