शुक्रवार पेठ येथे एलटी तार तोडली ; मुधोजी कॉलेज येथील फिडरशी आज्ञाताकडून छेडछाड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ एप्रिल - दिनांक २७ एप्रिल २००२२ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठ फलटण येथील येथे एलटी तार तोडून अज्ञात इसमाने नुकसान केले तर त्यानंतर सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास मुधोजी कॉलेज फलटण येथे येथील फिडरशी छेडछाड केल्याप्रकरणी आज्ञाता विरोधात फलटण शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, दिनांक २७ एप्रिल २००२२ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास, महावितरणचे लाईनमन यांना एका ग्राहकाचा फोन आला की, शुक्रवार पेठ फलटण येथे एलटी तार तुटून पडली आहे, त्यानंतर महावितरण कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली, तर एल टी तारेवर अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तारेचा तुकडा टाकल्यामुळे तार तुटून नुकसान झाले होते. त्यानंतर तार तुटल्यामुळे कोणाला इजा होऊ नये याकरिता, डीपी बंद करण्यात आला. तसेच सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास मुधोजी कॉलेज फलटण येथे असणाऱ्या ए बी स्विचचा आवाज झाला. महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी गेले असता तेथील ए.बी. स्वीच कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी, लाईट चालू असताना उघडला व फिडरशी छेडछाड केली असल्याचे दिसले. त्यामुळे फलटण फिडर पूर्ण बंद झाला असल्याची फिर्याद शरद पंढरीनाथ येळे सहाय्यक अभियंता महावितरण फलटण यांनी दिली आहे.



No comments