कलापथकांच्या माध्यमातून नागरिकांना दिली जाणार शासनाच्या विविध योजनांची माहिती ; सातारा जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
सातारा : राज्य शासनाला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. या दोन वर्षात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. या योजनांची अधिकची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कलापथकांच्या माध्यमातून गावोगावी नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे.
हे कलापथक सातारा, वाई, जावली, महाबळेश्वर, पाटण, खंडाळा, कोरेगाव, फलटण, पाटण, कराड व खंडाळा तालुक्यातील जेथे मोठे आठवडी बाजार भरतात व गर्दीच्या ठिकाणी महाआवास योजना, महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प व ई-पीक नोंदणी यासह विविध योजनांची कलापथकांच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
हे कार्यक्रम त्रिरत्न सांस्कृतिक कला व सामाजिक संस्था, सातारा, लोकरंगमंच, सातारा व आधार सामाजिक विकास संस्था, मु. आळजापूर पो. आदर्की बु ता. फलटण जि. सातारा या कलापथकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत
No comments