Breaking News

सातारा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी युक्रेन देशातून मायदेशी सुखरुप परतले - जिल्हा प्रशासनाची माहिती

All students from Satara district returned home safely from Ukraine - District Administration Information

    सातारा   : युक्रेन देशामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी सातारा जिल्ह्यातील एकूण 22 विद्यार्थी हे या देशामध्ये निवासी होते. युध्द काळापूर्वी 3 विद्यार्थी सुखरुप मायदेशी परतले होते. परंतू, 19 विद्यार्थी युध्द काळात युक्रेनमध्ये अडकले होते. भारत सरकार, महाराष्ट्र सरकार यांच्या विशेष प्रयत्नातून आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा प्रशासनामार्फत सातारा जिल्ह्यातील एकूण 19 विद्यार्थी  हे 1 मार्च ते 7 मार्च या कालावधीत सुखरुप त्यांचे मूळ गावी पोहचले आहेत.  सातारा व कराड तालुत्यातील प्रत्येकी 6 विद्यार्थी, फलटण तालुका 2, माण तालुका 3, पाटण तालुका 2, खंडाळा तालुका 1, जावली तालुका 1 आणि कोरेगाव तालुत्यातील 1 अशा एकूण 22 विद्यार्थ्याचा समावेश आहे.

No comments