Breaking News

दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीस केले जेरबंद ; फलटण शहर पोलिसांची कामगिरी

Phaltan city police arrested the gang, which was preparing for the robbery

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  - जाधववाडी येथे साई मंदीराचे आवारात, दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला फलटण शहर पोलिसांना  हत्यारासह पकडण्यात यश आले आहे.  केलेल्या कारवाईत ३ संशयितांना अटक करण्यात आली तर २ संशयित फरार झाले आहेत. संशयिताकडून गाडीसह तलवार, चाकू, काठी अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. 

    याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ६ मार्च २०२२ रात्री उशिरा पोलीस निरीक्षक भारत केंद्रे यांना, माहिती मिळाली की,पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आपल्या साथीदारासह घातक व धारदार हत्यारे घेवून वेरना गाडीमधून येवून वाहनांना अडवून त्यांच्यावर दरोडा टाकणार आहेत व त्यापुर्वी ते मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास मौजे जाधववाडी येथील साई मंदीराचे समोर एकत्र जमणार असल्याची खबर कळाली. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किंद्रे यांनी पथक तयार करून, साई मंदिर जाधववाडी येथे सापळा लावला.

    रात्री १ वाजण्याच्या सुमारास गिरवी रोड बाजूने एक सिल्व्हर रंगाची गाडी क्र.एम एच १४ - डी एफ ११५३ ही गाडी साईबाबा मंदीराचे आवारात येवून थांबली,  बातमीत नमुद केलेल्या वर्णनाप्रमाणेच गाडी असल्याने पोलिसांनी गाडीचे दिशेने जावून त्यांचे गाडीला शासकीय गाडी आडवी लावून गाडीतून उतरून त्यांना ताब्यात घेत असताना, गाडीतील लोकांना पोलिसांची चाहूल लागल्याने गाडीतील पाठीमागे बसलेले दोन इसम दरवाजा उघडून पळून गेले.  तर गाडीचा चालक तोसिफ उर्फ छोट्या अब्दुल शेख वय-२८ वर्षे रा. गजानन चौक फलटण,व त्याच्या शेजारी बसलेल्या अक्षय बाळकृष्ण माने वय- २६ वर्षे रा. राम मंदिराशेजारी दिवाणी हाऊस फलटण तसेच पाठीमागे बसणाऱ्या अभिषेक ज्ञानेश्वर महेंद्रे वय-27 वर्षे रा. आर्यमान हटेलच्या पाठीमागे लक्ष्मीनगर फलटण यास पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांची अंगझडती,  गाडी क्र.एम एच १४ - डी एफ ११५३ ची झडती घेतली असता ३ मोबाईल, १ चाकू, १ तलवार व एक काठी असे साहित्य सापडले. गाडीसह सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

No comments