प्रवाश्यांना घेउन चाललेली एसटी पेटली ; प्रवाशी सुखरुप
म्हसवड दि.५ - म्हसवड येथे सातारा आगाराची सोलापूर - सातारा एसटीच्या इंजिन मधून धुर येण्यास सुरुवात होऊन अचानक एसटीबसने पेट घेतल्याने एसटी चे मोठे नुकसान झाले असून, वाहकाच्या प्रसंगसावधानतेमुळे या अपघातामधून ४४ प्रवाशांचे जीव वाचले आहेत, मात्र एसटी जळून खाक झाली आहे.
याबाबतची घटना स्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी सकाळी सातारा आगारातून निघालेली सातारा सोलापूर बस क्रमांक MH11 BL9355 सोलापूरच्या दिशेने प्रवासी घेऊन आज सकाळी रवाना झाली होती. बस म्हसवड बसस्थानकात येऊन येथे काही प्रवासी उतरले व नंतर पुढील प्रवासास बस निघाली. म्हसवड पासून पंढरपूरच्या दिशेला म्हसवड पासून पाच किमी अंतरावर धुळदेव येथे दुपारी पावणे दोनच्या सुमारास बसच्या इंजिनमधून धुर यायला लागला नंतर बसने अचानक पेट घेतला क्षणातच संपूर्ण एसटीबसने पेट घेतल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली असून वाहक व चालकाच्या प्रसंगसावधानतेमुळे बसमधून धुर येण्यास सुरुवात झाल्यावर बसमधील प्रवासी सुखरुप बाहेर काढण्यात वाहक व चालक यशस्वी झाल्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. बसला आग लागल्याची माहिती स्थानिकांनी म्हसवड पालिकेला कळवताच तात्काळ म्हसवड पालिकेच्या आग्निशमन बंब घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
No comments