Breaking News

सातारा जिल्ह्यात 5 बाधितांचा मृत्यु ; 420 कोरोना पॉझिटीव्ह

Corona virus Satara District updates : 5 died and 420 corona positive

      सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 5 फेब्रुवारी  -  सातारा जिल्ह्यात काल दि. 4 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 420 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले आहेत. आज अखेर एकूण 278216 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर 5 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.  

    तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.

     जावली 5 (10631), कराड  80 (44221), खंडाळा 21 (15817), खटाव 38 (27746), कोरेगांव 38 (23502), माण 39 (19136), महाबळेश्वर 3 (5340), पाटण 9 (11179), फलटण 59 (40379), सातारा 100 (59777), वाई 23 (17423) व इतर 5 (3065) असे आज एकूण 420 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. 

No comments