Breaking News

श्रीमंत रामराजे यांच्या मुळे फलटण तालुका शंभर टक्के बागायत झाला - श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर

Phaltan taluka became 100% irrigated due to Shrimant Ramraje - Shrimant Vishwajitraje Naik Nimbalkar

  फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -: फलटण तालुक्यामध्ये राजे गटाच्या माध्यमातून विकास कामाचा डोंगर उभा करण्यात आला असून महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती  नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नातून धोम बलकवडी व नीरा देवघर या पाटबंधारे प्रकल्प मार्गी लागल्याने फलटण तालुका शंभर टक्के बागायत झाला आहे. श्रीमंत रामराजे, आ.दिपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे व श्रीमंत रघुनाथराजे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला आहे असे प्रतिपादन फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

    पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर (बाळराजे) यांच्या हस्ते पवारवाडी गावातील विविध विकास कामाचे भूमीपूजन,उदघाटन समारंभ संपन्न झाला, याप्रसंगी श्रीमंती विश्वजीतराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विश्वास दादा गावडे, श्रीराम सहकारी साखर कारखाना संचालक शिवाजी अण्णा पवार, श्रीराम बाजार ची संचालक जितेंद्र पवार, पवारवाडी च्या सरपंच सौ. जयश्री गावडे, उपसरपंच सौ. विद्या वरे ग्रामपंचायत सदस्य सौ. निर्मला गायकवाड, राहुल परकाळे, किशोर भोसले, सुहास पवार, विकास (काका) वरे, प्रदीप (दादा) वरे, युवराज (तात्या) वरे, दत्तात्रय गावडे, शसंजय (बाबा) परकाळे,  संजय (बाबा)वरे, संपत (दादा) पवार, योगेश जाधव, तुळशीराम शिंदे,  रमेश आणा पवार, आकाश भोसले आदी उपस्थित होते.

    पुढे बोलताना श्रीमंत विश्वजीत राजे म्हणाले पंचायत समितीच्या माध्यमातून येणाऱ्या विविध योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार असून, या योजने पासून कोणीही  गरीब शेतकरी वंचित राहणार नाही अशी ग्वाही श्रीमंत  विश्वजीतराजे  नाईक निंबाळकर यांनी दिली.

No comments