Breaking News

राजुरीच्या पोलीस पाटलास पोक्सो न्यायालयाकडून २ दिवस पोलीस कोठडी

Laxman Bagav of Rajuri has been remanded in police custody for 2 days by Pokso Court

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ फेब्रुवारी - : अल्पवयीन मुलीला रस्त्यात आडवून तिच्याशी अश्लिल भाषेत बोलून, तीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन तीच्या कुटूंबातील लोकांना जीवे मारण्याची धमकी दिलेल्या राजुरीच्या पोलीस पाटलास पॉक्सो न्यायालय सातारा येथे हजर केले असता,  न्यायालयाने संशयित आरोपीस दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

     राजुरी ता. फलटण येथील एका सोळा वर्षांच्या मुलीस ता. ३० जानेवारी रोजी पोलीस पाटील लक्ष्मण बागाव याने तीचा पाठलाग करत अल्पवयीन मुलीला रस्त्यात आडवून तिच्याशी अश्लिल भाषेत बोलून, तीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले व नंतर  मध्यरात्री बारा वाजता तीला घराबाहेर बोलावून तीच्याशी अश्लिल वर्तन केले. प्रकरणी लक्ष्मण बागाव याच्याविरुध्द बालकाचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम व भा.द.वि.सं. अंतर्गत विनयभंग कलमांन्वये गुन्हा नोंद झाला होता.

     पोलिसांनी पोलीस पाटील सुहास बागाव यास अटक करून सातारा येथील पॉक्सो न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयित आरोपीस दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

No comments