फलटण तालुक्यात 58 कोरोना पॉझिटिव्ह ; शहरात 7 , साखरवाडी 6
फलटण दि. 5 फेब्रुवारी 2022 (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 58 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 7 रुग्ण तर ग्रामीण भागात 51 रुग्ण सापडले आहेत.
दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 58 बाधित आहेत. 58 बाधित चाचण्यांमध्ये 39 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर 19 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 7 तर ग्रामीण भागात 51 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात साखरवाडी 6, जाधववाडी 4, कोळकी 3, खटकेवस्ती 1, झडकबाईचीवाडी 1, कांबळेश्वर 1, ढवळेवाडी 2, मिरगाव 1, हिंगणगाव 1, जिंती 2, रावडी बुद्रुक 2, राजाळे 1, सरडे 2, सांगवी 3, साठे 2, चौधरवाडी 1, तांबवे 1, नांदल 2, अलगुडे वाडी 1, गुणवरे 1, बरड 1, विडणी 1, गिरवी 3, सोमंथळी 1, सस्तेवाडी 1, दऱ्याचीवाडी 1, वाठार निंबाळकर 1, वडले 1, शिवाजीनगर तालुका खंडाळा 1, दहिवडी तालुका माण 1, चांदक तालुका वाई 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments