Breaking News

कर्ज वसुलीला आलेल्या फायनान्सवाल्यांकडून कर्जदारास मारहाण ; खंडणीचा गुन्हा दाखल

Beating the borrower by the financiers who came to recover the debt; Filed a extortion charge

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ११ फेब्रुवारी- थकीत कर्ज वसुलीकरिता श्रेयी इक्वीपमेंट फायनान्स लि. पुणे येथील अधिकाऱ्यांनी, मठाचीवाडी ता.फलटण येथील अनिल जगन्नाथ शिंदे, यास कोर्टाचे वॉरंट आल्याचे सांगत घरातून घेऊन जाऊन, मध्येच पिंप्रद हद्दीत रस्त्यात थांबवून, शिंदे यास मारण्याची धमकी देऊन, एक लाख रुपयांची मागणी करत मारहाण व दमदाटी केल्याप्रकरणी चौघांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल जगन्नाथ शिंदे रा. मठाचीवाडी ता.फलटण व त्यांचा मेव्हणा रमेश बाऊसो बुधनवर या दोघांनी श्रेयी इक्वीपमेंट फायनान्स लि. पुणे येथुन पोकलेन मशिन साठी दि १४/२/२०२० रोजी ४२,५०,०००/- रुपये कर्ज घेतलेले आहे. आतापर्यंत त्यांनी १३ हप्ते भरलेले आहेत. ७ हप्ते थकीत आहेत.

    दि. ०९/०२/२०२२  रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास श्रेयी इक्वीपमेंट फायनान्स लि. पुणेचे अधिकारी अरिंदम आचार्य व पंकज गायकवाड व त्यांच्या सोबत इतर दोन व्यक्ती असे त्यांचे लाल रंगाची चार चाकी गाडीतुन मौजे मठाचीवाडी ता फलटण येथे आले. अनिल जगन्नाथ शिंदे घरासमोर उभा असताना त्यांनी, त्याला कर्जाचे हफ्ते वेळेत का भरले नाही असे म्हणुन शिवीगाळ दमदाटी करु लागले. फायन्सास कंपनीचे अरिंदम आचार्य  म्हणाले की, तुमच्या नावाचे कोर्टाचे वॉरन्ट आहे, तुम्हाला आमचे सोबत पुण्याला यावे लागेल. त्यावेळी अनिल जगन्नाथ शिंदे त्यांना म्हणाले की, मी माझ्या गाडीवर येतो असे म्हणाल्यावर, शिंदे त्यांच्या मोटार सायकल नं MHILAQ 9865 वरुन त्यांचे सोबत जाण्यास निघाले. त्यावेळी फायन्सास कंपनीचा पंकज गायकवाड हा अनिल शिंदे यांच्या मोटार सायकलवरपाठीमागे बसला. फायन्सास कंपनीचे लाल रंगाचे चारचाकी गाडीचे पाठीमागुन फलटणच्या दिशेने जात असताना, मौजे पिंप्रद ता फलटण गावचे हद्दीत विठु माऊली पेट्रोल पंपच्या थोडे पुढे काही अंतरावर पंढरपुर ते फलटण जाणारे रोडवर अरिंदम आचार्य याने त्याची लाल रंगाची चार चाकी गाड़ी अनिल जगन्नाथ शिंदे यांच्या मोटार सायकलला आडवी मारुन, त्यांना थांबवले. व ते त्यांच्या चार चाकी गाडीतुन (नंबर माहित नाही) खाली उतरले व त्यावेळी अनिल शिंदे यांच्या मोटार सायकलचे पाठीमागे बसलेले फायनान्स कंपनीचे पंकज गायकवाड यास अरिंदम आचार्य यांने अनिल शिंदे यांच्या मोटार सायकलची चावी काढुन घेण्यास सांगितली.  मोटार सायकलची चावी काढून घेतलेवर, शिंदे यांना गाडीत बसवले. नंतर पंकज गायकवाड हे शिंदे यांना म्हणाले की, तु आता आम्हाला १ लाख रुपये रोख दे, नाहीतर तुला इथेच मारतो असे म्हणुन अनिल शिंदे यांना शिवीगाळ केली. त्यांच्या सोबत आलेल्या दोन अनोळखी इसमांनी शिंदे यांना धक्काबुक्की शिवीगाळ केली. त्यानंतर अनिल शिंदे त्यांना म्हणाले की, तुम्ही फलटणला चला तेथे माझे पार्टनर आहेत, त्यांना भेटु, परंतु आलेल्या लोकांनी शिंदे यांचे ऐकले नाही, दरम्यान त्यावेळी त्या ठिकाणी फलटणहून येणारे अनिल शिंदे यांचे चुलते धोंडीराम गुलाब शिंदे व त्यांच्या सोबत आलेल्या दोन व्यक्तीनी अनिल शिंदे यांची गाडी पाहून सदर ठिकाणी थांबले. व अनिल शिंदे यांची विचारपुस केली त्यावेळी अनिल शिंदे यांनी त्यांना झालेला प्रकार सांगत असताना, पुण्याहून आलेले सर्वजण लाल रंगाचे गाडीतुन फलटण बाजुकडे निघुन गेले असल्याची फिर्याद अनिल जगन्नाथ शिंदे यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार लीमन हे करीत आहे.

No comments