फलटण तालुक्यात 41 कोरोना पॉझिटिव्ह
फलटण दि. 11 फेब्रुवारी - 2022 (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. 10 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 41 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 7 रुग्ण तर ग्रामीण भागात 34 रुग्ण सापडले आहेत.
दि. 10 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 58 बाधित आहेत. 58 बाधित चाचण्यांमध्ये 35 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर 6 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 7 तर ग्रामीण भागात 34 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण घाडगेमळा 1,खुंटे 1, कोळकी 1, मठाचीवाडी 1, हिंगणगाव 2, पिंपरद 1, विडणी 2, निंबळक 1, पाडेगाव 1, पवारवाडी 1, सरडे 1, साखरवाडी 4, साठे 1, सोनवडी खुर्द 6, सस्तेवाडी 1, सुरवडी 2, दुधेबावी 1, वेळोशी 1, तांबवे 1, गिरवी 1, जाधववाडी 1, चव्हाणवाडी 1, शिंदेवाडी तालुका माळशिरस 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments