Breaking News

वडले येथे महिलेस मारहाण ; एकावर गुन्हा

Woman beaten at Wadle

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.17 जानेवारी - पोलीस स्टेशनला केस का दाखल केली म्हणून, महिलेस हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण केल्याप्रकरणी वडले ता.फलटण येथील एकजनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दि. १४ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास  मौजे  वडले ता. फलटण गावच्या हद्दीत जमीन गट नंबर २१९ च्या शेताच्या बांधावर, वंदना नाळे या मक्याचे पिकाची राखण करीत असताना, निखिल दिनकर नाळे हा तेथे आला व नाळे यांना म्हणाला, तू माझ्यावर पोलीस स्टेशनला केस का दाखल केली,  म्हणून चिडून जाऊन शिवीगाळ दमदाटी केली व हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, त्यावेळी वंदना नाळे यांचे मालक भांडणे सोडवण्यास आले असता, त्यांनाही हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याची फिर्याद वंदना साहेबराव नाळे यांनी दिली आहे.

No comments