मुधोजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश ; अक्षय पोतदार व सार्थक गावडे यांची राज्य गुणवत्ता यादीत निवड
यशस्वी विद्यार्थ्यां समवेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्राचार्य श्री गंगवणे बी एम, उपप्राचार्य श्री ननवरे ए वाय, परिवेक्षक श्री गोडसे सर, श्री काळे सर, श्री भोसले सर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.17 जानेवारी - फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण च्या विद्यार्थ्यांनी 2021 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. यामध्ये अक्षय राजन पोतदार या विद्यार्थ्याने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी 270 गुण मिळवून राज्याच्या शिष्यवृत्ती यादीमध्ये 12 वा क्रमांक मिळवला. तसेच सार्थक सतीशकुमार गावडे या विद्यार्थ्याने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी 288 गुण मिळवून राज्याच्या शिष्यवृत्ती यादीमध्ये 24वा क्रमांक मिळवला व तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला.
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये 6 विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादी मध्ये निवड झाली आहे. तन्मय संभाजी येळे (गुण-248) जिल्हा गुणवत्ता यादीत 103 वा क्रमांक, आर्यन अरुण पवार (गुण-244) जिल्हा गुणवत्ता यादीत 124 वा क्रमांक ,कु. तन्मयी प्रवीणकुमार पांगे(गुण-238) जिल्हा गुणवत्ता यादीत 144 वा क्रमांक, निखिल संदीप नेवसे (गुण-234) जिल्हा गुणवत्ता यादीत 176 वा क्रमांक, आदिराज कार्तिक कुचेकर (गुण-232) जिल्हा गुणवत्ता यादीत 186 वा क्रमांक.
इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 9 विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादी मध्ये निवड झाली आहे. वेदांत नरेश सोनगिरे (गुण-254) जिल्हा गुणवत्ता यादीत 17 वा क्रमांक, भावेश भरत शिंदे (गुण-254) जिल्हा गुणवत्ता यादीत 18 वा क्रमांक , साईश मारुती दिवेश (गुण-244) जिल्हा गुणवत्ता यादीत 35वा क्रमांक, मयंक मनिष जाधव (गुण-226) जिल्हा गुणवत्ता यादीत 71वा क्रमांक, सोहम सतीश कुमार पवार (गुण-218) जिल्हा गुणवत्ता यादीत 102 वा क्रमांक, चैतन्य सूर्यकांत भेस्के (गुण-216) जिल्हा गुणवत्ता यादीत 112 वा क्रमांक , अथर्व राज नामदेव गायकवाड (गुण-212) जिल्हा गुणवत्ता यादीत 129 व भाग क्रमांक, श्रीराज तानाजी काशीद (गुण-210) जिल्हा गुणवत्ता यादीत 136 वा क्रमांक.
या उज्वल यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या गुणवंत शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार केला व त्यांना शुभाशीर्वाद दिले. याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य श्री गंगवणे बी.एम., उपप्राचार्य श्री ननवरे ए. वाय. , पर्यवेक्षक श्री गोडसे टी.एम. , श्री काळे एस. एम. , श्री भोसले एल .के. उपस्थित होते. तसेच इयत्ता पाचवी चे शिष्यवृत्ती विभागाचे प्रमुख श्री उमेश शिंदे सर व श्री गणेश कचरे सर व इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती विभागाच्या प्रमुख सौ भावना भोईटे मॅडम यादेखील उपस्थित होत्या.
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना श्री खुंटे एम.पी., सौ गायकवाड ए.डी.,सौ. थोरात मॅडम, श्री मोहिते डी.एम .,श्री तोडकर एस.ए. ,श्री शिंदे यु.डी. , श्री रोमन व्ही. एम श्री कदम एस .पी श्री मोरे एस .एम.सौ. बावकर एस एम श्री मुळीक डी.बी ,सौ. सस्ते एस. एन.सौ. नाईक निंबाळकर ए ए., सौ आगवणे एस एस.सौ. मोहिते व्ही. एस., कुमारी घोलप एस .एस .श्रीमती मगर एन.पी.व सौ बुचडे एल.यु. यांनी मार्गदर्शन केले.
तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना श्री पवार आर. एम . श्री पवार ,श्री माने व्ही.एम, श्री घारगे डी .डी. , श्री निंबाळकर एस.जी. , कुमारी देशमुख बी.व्ही , सौ लामकाने मॅडम, श्री राऊत सर यांनी मार्गदर्शन केले
या यशस्वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभापती महाराष्ट्र राज्य विधान परिषद, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, चेअरमन फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सेक्रेटरी फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, मुधोजी हाय स्कूलच्या स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम, अधीक्षक श्री श्रीकांत फडतरे, प्रशालेचे प्राचार्य श्री गंगवणे बी.एम. , उपप्राचार्य श्री ननवरे ए. वाय. , ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री फडतरे एम. के. पर्यवेक्षक श्री गोडसे टी.एम. , श्री काळे एस .एम., श्री भोसले एल.के. तसेच प्रशालेतील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.
No comments