Breaking News

पैसे खाली पडले असल्याचे सांगून ५० हजार रुपये चोरले

The thief stole Rs 50,000 by misleading

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ जानेवारी -  पैसे खाली पडले आहेत,असे म्हणून जनता अर्बन कॉ- ऑप. बँकेच्या शिपायाची दिशाभूल  करून, मोटार सायकलच्या हँण्डलला अडकवलेली ५० हजार रुपयांची रक्कम पिशवीसह अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

    दिनांक २५ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १:३०  वाजण्याचे सुमारास, जनता अर्बन कॉ- ऑप. बँकेचे शिपाई नरेंद्र सस्ते हे , फलटण येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, राजवाडा शाखेतुन चेक वटवून बाहेर आल्यानंतर,  सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक राजवाडा शाखेसमोर एक अनोऴखी इसमाने त्यांना, तुमचे पैसे पाठीमागे खाली पडले आहेत, असे सांगितले व त्यांची दिशाभूल केली.  नरेंद्र सस्ते खाली पडलेले पैसे उचलत असताना,  मोटार सायकलचया पुढील हँण्डलला अडकवलेली ५० हजार रुपयांची रक्कम प्लॅस्टीकच्या पिशवीसह त्या अज्ञात चोरट्याने चोरून नेली, असल्याची फिर्याद नरेंद्र मुगूटराव सस्ते यांनी दिली आहे.

No comments