Breaking News

श्रीमंत सत्यजितराजे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

Satyajit Raje's birthday is not celebrated on the backdrop of Corona

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २९ जानेवारी - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सत्यजीतराजे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिनांक २९ जानेवारी रोजी असणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

    आज आपल्या महाराष्ट्र राज्यावर नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. गेली दिड-दोन वर्षे आपण सगळे एकत्रितपणे या संकटा विरुध्द लढा देत आहोत. समाधानाची बाब म्हणजे यामध्ये काही अंशी आपण यशस्वी झालो आहोत. मात्र या कोरोना संकटावर कायमची मात करणे हेच आपले सर्वांचे एकमेव ध्येय आहे. त्यामुळे अजूनही आपणास सदैव सतर्क राहावे लागणार आहे. या महामारी मध्ये आपण ज्या अनेक जीवलगांना मुकलो आहोत. त्यांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच व्यक्तीशः माझ्या कुटुंबातही यावर्षी दुःखद घटना घडल्या आहेत.

    यासर्व पार्श्वभूमीवर शनिवार, दिनांक २९ जानेवारी रोजी असलेला माझा वाढदिवस आहे. मी साजरा न करण्याचे ठरविले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जिथे असाल, तिथूनच मला आशीर्वाद व शुभेच्छा द्याव्यात.

    प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करून आपण प्रशासनाला सहकार्य करुया. आपण सर्वजण कोराना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या, हीच माझ्यासाठी वाढदिवसाची खरी भेट असेल. आपले प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच असे  आवाहन श्रीमंत सत्यजीतराजे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

No comments