Breaking News

तांबवे येथे उद्या शिवसेनेचा भव्य मेळावा ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

Shiv Sena's grand rally tomorrow at Tambave; Groundbreaking ceremony of development works by Guardian Minister Shambhuraj Desai

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१४ : तांबवे (ता. फलटण) येथे शिवसेनेच्या वतीने विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन, शिवसेना शाखेचे उद्घाटन तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य कार्यक्रम शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता भैरवनाथ मंदिरासमोर, तांबवे येथे होणार आहे.

    विधानपरिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून, महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व खनिकर्म मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात येणार आहे.

    कार्यक्रमास फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सातारा अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवसेना संपर्कप्रमुख सातारा जिल्हा शरद कणसे, माढा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील, शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती फलटणचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर तसेच शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. रेश्माताई भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

    याशिवाय पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते, सातारा जिल्हा परिषद सदस्य सह्याद्री चिमणराव कदम, शिवसेना जिल्हा समन्वयक विराज भैय्या खराडे, शिवसेना तालुकाप्रमुख पिंटूनाना इवरे यांच्यासह विविध सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, संचालक तसेच शिवसेनेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

    या कार्यक्रमात शिवसेनेच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य गिरीश सदाम बनकर, रुपाली लक्ष्मण सरगर, ज्योती गौतम मोरे, वैशाली संदीप कांबळे, सह्याद्री सूर्याजी उर्फ चिमणराव कदम तसेच पंचायत समिती सदस्य राहुल दादाराव नरुटे, योगिता दिपक गायकवाड, गणेश मल्हारी तांबे, पुष्पा संभाजी चोपडे, स्वाती हणमंत आटळे, विजया हनुमंत सोनवळकर, अमोल दशरथ सरस्ते आणि डॉ. संतोष अंकुश कांबळे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. नवनिर्वाचित सदस्यांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार असून, या माध्यमातून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा संदेश दिला जाणार आहे.

    तांबवे परिसरात कार्यक्रमाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू असून, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याकडे फलटण तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

    कार्यक्रमास तांबवे व परिसरातील ग्रामस्थ, शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना तांबवे शाखा व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments