बुधवार पेठ, फलटण येथील घराचे कुलूप तोडून विविध वस्तू व रोख रकमेची चोरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ जानेवारी २०२२ - बुधवार पेठ,फलटण येथील बंद घराचे कुलूप तोडून, घरात प्रवेश करून, घरातील तांब्या-पितळेची व चांदीची भांडी, रोख रक्कम, गॅस सिलेंडर, शेगडी असा एकूण २८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ७ डिसेंबर २०२१ रोजीचे सायं ७:३० वाजता ते दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान नाथद्वार,३० बुधवार पेठ, फलटण येथील मंगेश अविनाश गोसावी यांच्या घराचे कुलूप कशाने तरी तोडून, घरात प्रवेश करून, घरातील २ लाल रंगाचे भारत गँस कंपणीचे गँस सिलेंडर, २ स्टीलच्या शेगडया, एक इन्व्हर्टर व बॅटरी, १० ते १५ साडया, ३ तांब्याचे हंडे, १२ पितऴीचे डबे, १ चांदीचा करंडा,१ चांदीची वाटी, १ चांदीची समई आणि कपाटात ठेवलेली रोख रक्कम ११ हजार रुपये असा एकूण २८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला असल्याची फिर्याद मंगेश अविनाश गोसावी यांनी दिली आहे.
No comments