Breaking News

सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाचे निर्माते संदिप मोहिते-पाटील यांची प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंटला सदिच्छा भेट

Sandeep Mohite-Patil, Producer of Sarsenapati Hambirrao Visits Progressive Convent school

    फलटण ( गंधवार्ता वृत्तसेवा) दि.3 डिसेंबर २०२२ - सरसेनापती हंबीरराव या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासून महाराष्ट्रासह जगभरातील चाहते या चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे निर्माते संदीप मोहिते पाटील यांनी प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी चित्रपटा विषयीची भूमिका व त्या चित्रपटाविषयी माहिती शिक्षक व विद्यार्थ्यांना दिली. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा इतिहास सध्याच्या पिढीला माहीत व्हावा, या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती केली असल्याचे चित्रपट निर्माते संदीप मोहिते पाटील यांनी सांगितले.

    चित्रपटाचे निर्माते संदीप मोहिते पाटील व त्यांच्या टीमचे प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे आगमन झाल्यानंतर संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड यांनी शाल, श्रीफळ व रोप देऊन स्वागत केले. व शाळेच्या पुढच्या वाटचालीची व भविष्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

    चित्रपट निर्माते संदीप दादा मोहिते- पाटील, सौ. वैशाली संदीप मोहिते- पाटील, पुणे जिल्हा शिक्षक संघाचे नेते राजेंद्र मोहिते -पाटील, गायत्री मोहिते -पाटील,शुभम मोहिते- पाटील, संदेश मोहिते -पाटील ,जयश्री मोहिते -पाटील, पृथ्वीराज मोहिते- पाटील, यांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव विशाल पवार, संस्थेच्या संचालिका सौ.संध्या गायकवाड, सौ.प्रियंका पवार, मुख्याध्यापिका सौ.सुमन मकवाना, समन्वयिका सौ. अहिल्या कवितके, पर्यवेक्षक अमित सस्ते, तसेच शिक्षक सौ.रोहिणी ठोंबरे,सुशांत अहिवळे ,निखिल कापले, ज्ञानेश्वर जाधव , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.

No comments