फलटण येथे २० जानेवारीला 'माणूसकीची भिंत'
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ जानेवारी - लायन्स क्लब ऑफ फलटण प्लॅटिनमच्या वतीने गरजू व गरीब व्यक्तींना मदतीसाठी माणूसकीची भिंत हा उपक्रम फलटण मधील नागरिकांच्या सहकार्याने गुरुवार दि. २० जानेवारी २०२२ रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत वेदांत टेक्सटाईल्स, श्रीराम बझार शेजारी, महात्मा फुले चौक, फलटण येथे राबविण्यात येणार आहे.
माणूसकीच्या भिंतीच्या माध्यमातून समाजातील गरजू व गरीब व्यक्तींना मदत करण्यात येणार आहे. तरी आपणाकडे वापरण्यायोग्य असलेले कपडे व वस्तू आपण आमच्याकडे देऊ शकता. आम्ही या वस्तू निश्चितच अशा लोकांपर्यंत पोहचवू ज्यांना त्याची अत्यंत गरज आहे, तरी नागरिकांनी असे आवाहन वापरण्यायोग्य असलेले कपडे व वस्तू आमच्याकडे आणून द्याव्यात असे आवाहन लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्षा ला. सौ. निलम लोंढे पाटील, सेक्रेटरी ला. सौ. वैशाली चोरमले, खजिनदार ला. सौ. मंगल घाडगे यांनी केले आहे.
No comments