Breaking News

श्रीमंत रघुनाथराजे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

Shrimant Raghunathraje's corona test positive

 गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि.  18 जानेवारी 2022 - कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे.

   ते फलटण येथील जायव्हीला या आपल्या निवासस्थानी, होम क्वारंटाईन आहेत. पुढील काही दिवस ते लोकांना भेटू शकणार नाहीत, याबद्दल फलटणकर जनतेची त्यांनी माफी मागीतली असून, माझी प्रकृती उत्तम आहे, काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क,सॅनिटायझर चा नियमित वापर करा असे आवाहनही श्रीमंत रघुनाथराजे यांनी केले आहे.

श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे काही महत्वाचे काम असले तर सुरज पाटणकर (📞 ७०३०९७७२७५) यांना संपर्क करावा.

No comments