सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व जुनियर कॉलेज चा दहावीचा निकाल 98.96 टक्के
कोळकी (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ - सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व जुनियर कॉलेज चा इयत्ता दहावीचा मार्च 2026 चा निकाल 98.96 टक्के लागला असून शाळेने उज्ज्वल यश संपादन केले आहे. परीक्षेस एकूण 97 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 96 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
शाळेमध्ये कु. श्रेया संतोष जाधव हिने 96.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. अनुष्का सचिन सस्ते हिने 95.20 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर कु. वैष्णवी सूर्यकांत ढोक हिने 94.40 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, अध्यक्ष तुषार गांधी, सचिव ॲड. सौ. मधुबाला भोसले, सर्वसंचालक, प्रशासकीय संचालिका सौ. स्वाती फुले, प्राचार्य नागेश पाठक, आनंदवन प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण, सर्व शिक्षकवृंद तसेच पालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments