मुधोजी हायस्कूल चे १० वी (एस एस सी )बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश ; निकालामध्ये मुलिंची सरशी,विद्यालयाचा निकाल ९३.७२%
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ :- फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण च्या सन २०२५/२६ चा इयत्ता दहावी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, पुणे मार्फत घेण्यात आलेल्या १० वी (एस एस सी )बोर्ड परीक्षामध्ये विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले व यशाबरोबर च मागील वर्षीप्रमाणे उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली.
फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल मध्ये इयत्ता दहावी एस एस सी बोर्ड परीक्षामध्ये परीक्षेस बसलेले एकूण विद्यार्थी ७३३ यामध्ये एकूण ६८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यामध्ये १८५ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली , २६० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली,१७९ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली तर ६३ विद्यार्थ्यांनी पास श्रेणी प्राप्त केली. व विद्यालयाचा एकूण निकाल ९३.७२% इतका लागला
या निकालात मुलींनी बाजी मारली असून इयत्ता दहावी एस एस सी बोर्ड परीक्षेत प्रथम तीन क्रमांक व त्यांची टक्केवारी पुढील प्रमाणे- प्रथम क्रमांक सयुक्तपणे कु जान्हवी हंबीर लांडगे गुण ४८२/५००(९६.४०% ) व कु सई रामदास शिंदे गुण ४८२/ ५०० ( ९६.४०%) या दोघी विद्यार्थिनींनी पटकविला. तर द्वितीय क्रमांक कु वेदांतिका विकास कणसे पाटील गुण ४७२/५०० (९४.४०%), तर तृतीय क्रमांक कु श्रेया नितीन कदम गुण ४६८/५००.(९३.६०%) वरील विद्यार्थ्यानी प्रशालेत प्रथम तीन क्रमांक पटकावत उज्ज्वल असे यश संपादन केले आहे.
संस्कृत व गणित विषयात १०० /१०० गुण प्राप्त करणारे प्रशालेचे गुणवंत विद्यार्थी - प्रशालेतील कु. सई रामदास शिंदे या विद्यार्थिनीला संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले तर गणित विषयात आर्यन रूपचंद शिंदे , आदित्य संदीप बोडके, मयंक स्वप्निल दोशी या विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळवत दैदीप्यमान अशी कामगिरी केली आहे.
वरील सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे व त्याना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार मा.श्री दीपकराव चव्हाण ,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,सातारा जिल्हा परिषदे चे माजी अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्यूकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी मा. अरविंद निकम, तपासणी अधिकारी मा.दिलीप राजगुडा , सहायक तपासणी अधिकारी मा.सुधीर अहिवळे, प्रशालेचे प्राचार्य श्री वसंतराव शेडगे, माध्यमिकचे उपप्राचार्य ए वाय ननवरे, ज्युनियर कॉलेज उपप्राचार्य मा.सोमनाथ माने, माध्यमिकचे पर्यवेक्षक श्री रावसाहेब निंबाळकर, श्री राजेंद्र नाळे, पर्यवेक्षिका सौ पूजा पाटील,फलटण एज्यूकेशन सोसायटीच्या नियामक मंडळा चे सदस्य ,शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य व शिक्षकवृंद ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments