संचारबंदीत फिरणाऱ्या दोघांवर फलटण मध्ये गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सातारा जिल्हयासाठी दिनांक १०/०१/२०२२ रोजीचे ०.०० पासून पुढील आदेश होईपर्यंत विविध निर्बंध घोषित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार रात्री संचार बंदीचे आदेश असतानादेखील विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्यावर फलटण शहर पोलिसांनी कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. तरी नागरिकांनी जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या निर्बंधाचे पालन करावे,व संचारबंदीत कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये.
निर्भया पथक रात्री पेट्रोलिंग करत असताना दि.१० रोजी ००.४५ वाजाता पाचबत्ती चौक फलटण येथे ओंकार हा युवक मास्क परिधान न करता, विनाकारण फिरत असताना, मिऴुन आला. याने जिल्हा दंडाधिकारी सातारा यांनी कोरोनो आपत्ती व्यवस्थापन अनुषंगाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरुन आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दि.१० रोजी ००.५० वा क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे वैभव हा युवक विना मास्क व विनाकारण फिरत असताना मिऴुन आला. याने जिल्हा दंडाधिकारी सातारा यांनी कोरोनो आपत्ती व्यवस्थापन अनुषंगाने केले आदेशाचे उल्लंघन करुन सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरुन आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments